USला आल्यावर मनापासुन पटलेली, पटत रहाणारी एक कविता (youtube वर http://www.youtube.com/watch?v=nXcNcvmy-Tg&feature=related ऐकली) तीच खाली लिहीत आहे. (अशुद्ध लेखनाच्या चुकांबद्दल क्षमस्व)
अधांतरी:
Visa stamping झाल्यावर एकच धावपळ उडाली
जे स्वप्नात पाहीलं होतं ते वास्तवात येता उगीच भिती वाटु लागली
भेटी-गाठी झाल्या, खरेदी झाली, सत्कार झाले, बॅगही भरली
ही सगळी गडबड लग्नाच्याही वर झाली
घरातुन पाय काढायच्यावेळी लक्षात आलं..
आजीशी थोडेसे बोलायचे राहूनच गेलं..
स्वप्नांची दुनिया बाहेर होती, आपुलकीची छाया घरातच होती,
काहीतरी मिळवण्यासाठी हे येवढे सगळे सोडायचं..
आता या घरा समोरच्या अंगणात आम्ही पुन्हा कधी खेळायचं..
आज अश्रुंच वजन स्वप्नांपेक्षाही जास्त झालय..
नकोच ही America अस हजारदा वाटुन गेलं
विमान तळावर मित्र-मैत्रिणींची गर्दी झाली होती..
कधी नव्हे ते अंगाऱ्यार्ची पुडी मी खिशात ठेवली होती..
हसत होतो बोलत होतो सगळयांचा निरोप मी घेत होतो..
पाठ फिरवण्याही वेळ आली,
बाबांची पापणी हलकेच गलबलली बरेच काही बोलुन गेली
सातासमुद्रा पलीकडे निघालायस
सम्रुद्धीच्या राज्यात निघालायस
यशाची नवनवी शिखरे चढताना इकडची काळजी करु नकोस
पण पत्र लिहायला मात्र विसरु नकोस
एका डोळ्यात कौतूक आणि दुसऱ्या डोळ्यात काळजी
तुझी खूप आठवण येइल रे दिवाळीच्या सकाळी
व्यवसायिकतेच्या दुनियेत मनातला ओलावाही जप
जसा आहेस जाताना परत येतानाही तसाच असं
पाश्चात्य संस्क्रुतीत झालास जरी दंग.. तोल नको सोडु
विमानात मिळेल सगळे पण डाव्याबाजुच्या कोपरयात लाडु ठेवलेत बांधुन ते नको विसरु..
मित्र विचारतात मी काय miss करतो?
कसं सांगु मी काय miss करतो?
शाळेत final ला पहील्या ball वर out झलो होतो
"गणपतीच्या मांडवात मुद्दाम भांडलो होतो"
final year च्या partyत खूप रमलो होतो
"आईच्या हातचे कधी मनसोक्त जेवलो होतो"
कसं सांगु मी काय miss करतो?
इथली संपन्नता पाहुन तोंडात बोटे जातात
मात्र सम्रुद्धीच्या देशातील लोक देखील समाधानच शोधतात
इथल्या इंग्रजाळलेल्या पंजाबी-गुजरती पोरांन्ना पाहुन डोक्यात सणक भरते
पण मराठी मंडळीत देखील इंग्रजी बोलणाऱ्यांची अक्षर्रश: कीव येते
मित्रत्वाने वागवतात पण मित्र कधीच नसतात
इथल्या सर्व गणितांची उत्तरे शेवटी शून्यच येतात
म्हणुनच वाटत देवून टाकावे जिंकलेले सर्व काही
राहवे परत आपल्याच देशात बाबांच्या संगतीत
राजाभाऊची भेळ खावी फडतरेची मिसळ चापावी
रंकाळ्यावर उगीच इकडून तिकडे चक्कर मारावी
राजाबळाच पान खाऊन कोल्हापुरी शिवी प्रेमाने द्यावी
त्याची उधारी राहिलीच की द्यायची
परक आभाळ जिंकण्यासाठी जमीन आम्ही सोडली
इथुनही आभाळ दिसतय तेवढच उंच
पण आतातर पायाखाली जमीनही नाही उरली
कावळा राहीलो ना हंस, झालो आम्ही अधांतरी झालो आम्ही अधांतरी..
Sunday, May 18, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

4 comments:
Good one man..
masta ahe ... farach sundar ...
Naad Kayla...
Punyat astana ithle (Germany) che Vedh,
Ithe aale ki Panyachi oodh
Hech chalu asta
*Naad KHULA
Post a Comment